पिंपरी,दि.२३ फेब्रुवारी २०२५ :- ” गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला ” यासारख्या असंख्य भजन, किर्तनाच्या माध्यमातून अज्ञान, अस्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मुलनासाठी अखंड परिश्रम घेणारे मानवतावादी संत गाडगेबाबा हे थोर समाजसुधारक होते असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे,विधीतज्ञ विनोद पाटील,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते नरेश कदम, विशाल जाधव, निखील दळवी,अमोल पुन्हासे,सुनिल अभंग, श्रीरंग काळभोर, गणेश मांगडे,व्ही.एस.राऊत तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
संत गाडगेबाबांनी अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, विद्यालये सुरु केली. त्यांच्या नावाने शासन स्तरावर संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान देखील सुरु आहे. संत गाडगेबाबा यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्यात येते.