पिंपरी-पिंपरी-चिंचवड महानगर पालिका झोपडपट्टी स्थापत्य विभागाकडून प्रभाग क्र.29(19) भाटनगर, अशोक नगर,इमारत क्र 1 समोर काँक्रीटीकरण होत असताना स्थानिक रहिवाशी पत्रकार दीपक श्रीवास्तव(माहिती अधिकार कार्यकर्ता) ठेकेदार भेसळयुक्त,निकृष्ट दर्जाचे काम करताना त्यांना विनंती केली”आपण हे काम चांगले करा,आपल्या या कामात काँक्रीट मध्ये भेसळ आहे,हे काम अधिक काळ टिकणार नाही”असे सांगितले असता ठेकेदार यांनी रागात आपले काम बंद केले,घाई घाईत माप घेऊन कामाचे फोटो काढून अर्धवट काम सोडले.ठेकेदार यांनी मी कामात अडचण आणली असे दाखवून त्या भागातील ठेकेदार याचा एजंट किरण दाभाडे याना माज्याविरुद्ध तक्रार केली, त्यावेळी किरण दाभाडे या इसमाने मला फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली,तू ठेकेदारांच्या कामात अडचण आणली तर तुला मी बघून घेऊन,तुझे मी कामच करतो,तुला कोणालाही तक्रार कर,आमचे कोण्हीही वाकडे करणार नाही. अशी धमकी दिली.प्रभागात चांगले काम झाले पाहिजे,महापालिकेचा पैसे म्हणजे जनतेच्या कर रूपाने मिळालेला पैस्याचा विनियोग चांगला,पारदर्शक व्हावा म्हणून ठेकेदारास फक्त विनंती केली,ठेकेदाराने गल्ली बोळा तीळ,भाड्याने घेतलेले गुंड दादागिरी करून आमचाआवाज दाबण्याचा प्रयन्त करणार असतील तर आम्ही ते खपवून घेणार नाही.
या सर्व कामाची उच्चस्तरीय चोकशी झाली पाहिजे, चौकशी होईप्रयन्त ठेकेदार यांचे बिल अदा करू नये म्हणून मा.आयुक्त,झोपडपट्टी कार्यकारी अभियंता यांना ठेकेदारांच्या विरुद्ध लिखित तक्रार देणार,ठेकेदार यांनी केलेले काम भ्रष्ट असून त्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे,तसेच मा.पोलीस आयुक्त यांना मला देण्यात आलेली धमकी बाबत कायदेशीर कारवाही करावी अशी मागणी करणार आहोत.