दिल्ली
दिल्ली येथे मराठी साहित्य संमेलन होत आहे.
संमेलनाच्या पूर्वसंध्येला मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे महादजी शिंदे एक्सप्रेस मध्ये साहित्यिकांना आणि साहित्य प्रेमींना भेटले.
यावेळी त्यांनी अंघोळीची गोळीचे संस्थापक माधव पाटील यांच्यासोबत संवाद साधून हवामानठोसा या मराठमोळ्या शब्दाचे अनावरण केले. यावेळी
हवामानठोसा म्हणजे आपली पृथ्वी वाचवण्यासाठी उचललेले छोटे पाऊल असे सामंत यांना सांगितले.
पृथ्वीला हवामान बदल (Climate Change) हा आजार झालाय. त्यावर उपाय म्हणजे हवामानठोसा.
हवामानठोसा म्हणजे पृथ्वीवरील नैसर्गिक स्त्रोत जपून वापरणे होय.
शाश्वत विकासामध्ये आपण मनुष्याच्या विकासासाठी निसर्गाचा अशा प्रकारे वापर केला पाहिजे की पर्यावरणाची हानी कमीत कमी झाली पाहिजे. त्यासाठीच महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेने हवामानठोसा द्यायला हवा.हवामानठोसा म्हणजे आपली पृथ्वी वाचवण्याची पंचसुत्री आहे.
ठोसा देणे म्हणजे आपल्या पृथ्वीसाठी किमान पाच गोष्टी करणे होय.
१)नको असलेले दिवे,फॅन बंद करणे.
२)पाणी बचत करणे.
३) झाडे लावणे,ती जगवणे,झाडांना खिळेमुक्तझाडं करून सन्मान देणे.
४) स्वच्छ हवेसाठी जागरूक असणे.
५) शासन आणि प्रशासन यांना वेळोवेळी कारवाई करण्यास भाग पाडणे.
या आणि इतर गोष्टी करणे म्हणजेच हवामानठोसा देणे होय.
हवामानठोसा. हा मराठमोळा शब्द महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी गोळी टीमने दिल्लीला जाणाऱ्या महादजी शिंदे एक्सप्रेसमध्ये याची जनजागृती केली.