पिंपरी-भाटनगर,बौद्ध नगर,प्रभाग क्र 19 येथे 15 दिवस झाले लुंकड नावाचा ठेकेदार यांनी खड्डे आणि रस्त्यावरील राडारोडा मुळे दररोज अपघात होत असताना अ प्रभागातील स्थापत्य अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे अपेक्षित होते,
पावसाळा सुरू,खड्डे,राडारोड्या मुळे रोज वाहन घसरून पडून अपघात जखमी झाले,शनिवारी रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते यांची मातोश्री रात्री रस्त्यावरील लाईट बंद मुळे खड्यात पाय घसरून पडून डोक्याला गँभिर दुखापत झाली,त्याना बिर्ला हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये ऍडमिट केले असून त्या सिरियस असल्याची माहिती आहे.या सर्व घटनेस स्थापत्य कार्यकारी अभियंता वैशाली ननावरे,उप अभियंता मीनल डोडल,कनिष्ठ अभियंता दोषी असून त्यांना कर्तव्यात बेजबाबदारपणे काम केले म्हणून मा.आयुक्त शेखर सिंह,पालकमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देऊन निलंबित करण्याची मागणी करणार तसेच ठेकेदार लुंकड यांच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार करणार असल्याची माहिती नागरिकांनी,समाजीक संघटनेने माहिती दिली आहे.