दि.२८ जून रोजी किंग मार्शल आर्ट्सच्या वतीने थेरगाव येथे बॅल्क बेल्ट (ग्रेडिंग) प्रशिक्षण शिबिर आणि डॅन ग्रेडिंग कार्यक्रम आयोजित केला होता. या विशेष शिबिरात एकूण ३० विद्यार्थी ,प्रशिक्षक सहभागी झाले होते.
यात पिंपरी चिंचवड येथील किंग मार्शल आर्ट्सचे चार विद्यार्थी श्रेंया मेडशिगपाटील अनमोल यादव,समिक्षा म्हमाणे ,रुद्र शिर्के यांनी प्रशिक्षणशिबिरात,सहभाग नोदवित कराटेमधील सर्वच बॅल्क बेल्ट पदवी मिळवली.
तसेच हे प्रशिक्षण शिबिर घेणायाकरिता माजी पीएसआय विजय पाटील,रुचित थोरवे, किंग मार्शल आर्ट्स येथील कराटे मुख्या कोच जयदेव म्हमाणे यांनी सर्व प्रशिक्षकांना मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम अविनाश रानवडे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आयोजित करणायत आला होता.
या शिबिरात उपस्थित असलेल्या प्रमुख प्रशिक्षकांमध्ये समृध्दी म्हमाने,रोहन गायकवाड हर्षं मोरे इतर शिक्षक शिबिरात सामील होते. यात अनेक मुलामुलीनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुशांत पाडे यांचाही समावेश होता शिबिरादरम्यान, तांत्रिक कराटे कौशल्ये, डॅन ग्रेडिंग प्रक्रियेतील अंतर्दृष्टी आणि शारीरिक क्षमतांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले गेले .