Home पिंपरी चिंचवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 753 पिशव्या रक्त संकलन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 753 पिशव्या रक्त संकलन

- भोसरी विधानसभा मतदारसंघात विविध विधायक  कार्यक्रम - आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून महारक्तदान, गोशाळेला चारा वाटप

0 comments

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस शहरामध्ये विधायक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून महारक्तदान शिबिर, गोशाळेला चारा वाटप तसेच विविध विधायक कार्यक्रम राबवण्यात आले.

दरम्यान,  वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या महा रक्तदान शिबिरातून भोसरी मतदारसंघातून  753 पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले. यामध्ये युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात यावा. तसेच, राज्यातील वैद्यकीय रुग्णालयांमध्ये रक्ताचा साठा उपलब्ध होईल त्या अनुषंगाने महा रक्तदान शिबिर आयोजन करावे. सामाजिक उपक्रम आणि समाजातील शेवटच्या घटकाला मदत होईल असे कार्यक्रम गीत होर्डिंग व जाहिरात भाजी वरती अनावश्यक खर्च करू नये, असे आवाहन भाजपच्या प्रदेश कार्यालयाने केले होते.

वाढदिवसानिमित्त सुरुची अन्नदान…

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरीमध्ये “सुरुची भोजन” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पताशीबाई रतनचंद मानव कल्याण ट्रस्ट संचलित अंध मुलांची शाळा, एमआयडीसी भोसरी येथील आश्रम शाळा या दोन्ही ठिकाणी अन्नदान करण्यात आले.

******
गो- शाळेमध्ये चारा सेवा…
पांजरपोळ भोसरी येथील गोशाळेमध्ये चारा सेवा अर्पण करण्यात आला. गोवंश संवर्धन आणि गोवधाच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रात  ४ मार्च २०१५ रोजी राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू केला. याबद्दल गोशाळेमध्ये आभार व्यक्त करण्यात आले.

प्रतिक्रिया :
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस पिंपरी चिंचवड शहरांमध्ये विविध विधायक उपक्रम हाती घेऊन साजरा करण्यात आला. यामध्ये सर्वात महत्त्वाचे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. रक्ताची वाढती गरज लक्षात घेऊन युवकांच्या माध्यमातून हा विधायक उपक्रम राबवण्यात आला. याला युवकांकडूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व रक्तादात्यांचे आभार व्यक्त करतो. याशिवाय अंधशाळेमध्ये अन्नदान आणि गोशाळेमध्ये चारा वाटप करण्यात आले. महाराष्ट्राप्रती समर्पण भावनेतून काम करणारे देवेंद्रजींचा वाढदिवस सेवाभावी वृत्तीने होतो याचे समाधान वाटते.

– महेश लांडगे,
आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00