पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहराच्या ५५व्या वर्धापनदिनानिमित्त एक अनोखा ऐतिहासिक नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे. “पिंपरी चिंचवड शहर निर्मितीचा प्रवास” या नाटकाद्वारे शहराच्या जडणघडणीमधील प्रमुख व्यक्तीमत्त्वे आणि तत्कालीन सरपंच रंगमंचावर उभे राहणार आहेत.
हा ऐतिहासिक कार्यक्रम कधी आणि कुठे?
📅 दिनांक: मंगळवार, ४ मार्च २०२५
⏰ वेळ: संध्याकाळी ५ वाजता
📍 स्थळ: सायन्स पार्क प्रेक्षागृह, चिंचवड
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:
✅ पं. जवाहरलाल नेहरू, अण्णासाहेब मगर, यशवंतराव चव्हाण यांच्यासह पिंपरी चिंचवडमधील चार तत्कालीन सरपंच रंगमंचावर येणार!
✅ “पिंपरी चिंचवड शहराचा इतिहास” या विजय जगताप यांच्या पुस्तकावर आधारित नाट्यप्रयोग
✅ दिग्दर्शन: गणेश दिघे
✅ रे क्रिएशनचे अविनाश आदक निर्मित पिंपरी चिंचवडच्या इतिहासावर दृकश्राव्य माहितीपट
✅ “या नगरीला पिंपरी चिंचवड हे नाव कसे पडले?” या ऐतिहासिक क्षणांचे अभिवाचन – संदीप साकोरे व प्रा. माया मुळे
✅ लेखक विजय जगताप यांची विशेष मुलाखत
प्रवेश विनामूल्य – इतिहासाचा साक्षीदार बना!
शहरप्रेमींनी आणि इतिहासप्रेमींनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक संभाजी बारणे यांनी केले आहे.