21
पुणे:
कात्रजमधील गुजर निंबाळकरवाडी परिसरात सोमवारी सकाळी एक मोठी दुर्घटना टळली. सोनवणे बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्याच्या खिडकीतून पडण्याच्या स्थितीत असलेल्या ४ वर्षीय चिमुरडीला वेळेवर वाचवण्यात आले. ही घटना सकाळी ९:०६ वाजता घडली.
शेजारील रहिवासी उमेश सुतार यांच्या ओरडण्यावरून अग्निशमन दलाचे कर्मचारी योगेश अर्जुन चव्हाण यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. भाविका चांदणे असे या मुलीचे नाव असून, घराला कुलूप होते आणि ती एकटीच घरात होती. तिची आई दुसऱ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी बाहेर गेली होती.
दरम्यान आई परत येताच, योगेश चव्हाण यांनी तिच्या मदतीने दरवाजा उघडून बेडरूमच्या खिडकीत अडकलेल्या मुलीला आत खेचून सुरक्षित वाचवले. त्यांच्या प्रसंगावधानामुळे चिमुरडीचा जीव वाचला.