पुणे : ( प्रतिनिधी, )
महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर रोहित पवार यांनी पुन्हा एकदा टीकेची तोफ डागली आहे. एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “पुरुषांसाठी आखलेली योजना केवळ निवडणूक काळात मतांसाठी डिझाईन केली गेली होती,” असा आरोप करत त्यांनी सरकारच्या भूमिका आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
ते म्हणाले, “या योजनेचा उद्देश निवडणूक काळात घाबरलेल्या सत्ताधाऱ्यांनी मतं मिळवण्यासाठी राबवला. सरकारने पैसे कसेही वापरले तरी मतदान मिळाले पाहिजे, अशा हेतूने ही योजना बनवली. यासाठी जबाबदार कोण? पुरुषाचं नाव कसं आलं? संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही? मंत्री महोदयांनी राजीनामा द्यावा.”
फोन टॅपिंग व हनी ट्रॅप प्रकरणावरूनही गंभीर प्रश्न
हनी ट्रॅप प्रकरणावर बोलताना त्यांनी फडणवीसांवर थेट निशाणा साधला. “फडणवीस यांनी मुद्दा चेष्टेत नेला, पण खडसे जे बोलत आहेत, त्यावर लक्ष देण्याची गरज आहे. लोढा यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे,” अशी जोरदार मागणी त्यांनी केली.
फोन टॅपिंगबाबत खळबळजनक इशारा
रोहित पवार म्हणाले, “मी एका प्रकरणावर तासाभरात ट्विट करणार आहे. अजित दादा काय करतात ते बघू,” असा सूचक इशारा देत, एका नव्या वादळाची चाहूल दिली.
राजकीय घडामोडींवर भाष्य
तटकरे यांचा उल्लेख करत ते म्हणाले, “ते भविष्यात भाजपाचे उमेदवार असू शकतात.”
तर कोकाटे आणि अजित पवार यांच्या संदर्भात, “जेवणाचा बेत असेल तर सेंड ऑफ असू शकतो, जाणाऱ्याला टाटा असं असू शकतं,” असे म्हणत त्यांनी सूचक विधान केलं.
पोलीस विभागावरही टीका
“आम्ही पोलिसांना भेटणार होतो, ही माहिती पोलीस आयुक्तांनी कशी लीक केली?” असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी गुप्तता पाळण्यात आलेल्या हलगर्जीपणावर टीका केली.
निवडणूक व कुस्तीगिर परिषदेत राजकारणावर प्रतिक्रिया
लक्ष्मण हाके यांची बाजू घेत रोहित पवार म्हणाले, “त्यांची कुठेही चूक नाही. त्यांना फोन आला म्हणून त्यांनी उत्तर दिलं. कुस्तीगिर परिषद निवडणुकीत कोणी राजकीय भूमिका घेत असेल, तर ती चूक आहे.”