Home महाराष्ट्र धर्मांतराचा मुद्दा: हिंदू मुलींवर अत्याचार झाला त्यावेळी का नाही बोलला?

धर्मांतराचा मुद्दा: हिंदू मुलींवर अत्याचार झाला त्यावेळी का नाही बोलला?

- भाजपा आमदार महेश लांडगे यांनी सभागृहात सुनावले - आमदार जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांना खुले आव्हान

0 comments

मुंबई/ पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
भयभीत तर हिंदू समाजातील लोकसद्धा झाले आहेत. 10 वर्षांच्या हिंदू मुलींवर पादऱ्यांनी अत्याचार केल्याचा गुन्हा सोनाई पोलीस ठाण्यात दाखल झाला. आमच्याकडे पुरावे आहेत. त्या अत्याचारी पादऱ्यांवर सभागृहात कोणीही बोलले नाही. कोणत्याही अल्पसंख्याक समाजाला घाबरण्याची गरज नाही. पण, हिंदू समाजावरील अत्याचाराविरोधात आम्ही बोलत असू, तर त्यावर आक्षेप घेण्याचीही गरज नाही. अल्पसंख्यास समाजात भीती आहे, असा चुकीचा संदेश (नॅरेटीव्ह) तयार करण्याचा प्रयत्न करु नये, अशा शब्दांत भाजपा आमदार महेश लांडगे सभागृहामध्ये आक्रमक भूमिका मांडली.

ख्रिश्चन धर्म स्वीकारावा म्हणून अत्याचार केल्यामुळे सांगली येथील ऋतुजा राजगे या महिलेने सात महिन्यांची गरोदर असताना आत्महत्या केली होती. ‘‘प्राण सोडला..पण धर्म नाही..’’ असा संदेश देत हिंदू समाजाने प्रचंड मोर्चे काढले. या मोर्चांमध्ये आमदार महेश लांडगे, आमदार गोपिचंद पडळकर यांच्यासह हिंदुत्त्ववादी नेत्यांनी प्रक्षोभक भाषणे केली. त्याचे पडसाद सभागृहात उमटले.

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी सभागृहात सांगितले की, सांगलीतील धर्मांतराच्या घटनेनंतर मोठे मोर्चे काढण्यात आले. त्यामुळे अल्पसंख्याक समाजात भितीचे वातावरण आहे. तोच धागा पकडून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘‘पादऱ्यांचा सैराट करू..’’ अशी भाषणे सभागृहाचे सदस्य करीत आहेत. त्यामुळे राज्यातील ख्रिश्चन समाजात भिती निर्माण झाली आहे,  अशी भूमिका मांडली.

भाजपाचे आमदार योगेश सागर यांनी धर्मांतराच्या मुद्यावर हिंदूत्ववादी बोलले, तर नॅरेटिव्ह तयार केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात एकही दंगा झाला नाही. कोणताही अल्पसंख्याक समाज असुरक्षित नाही.
*****

राज्यात कायद्याचे राज्य…!
कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी सभागृहातील चर्चेवर स्पषट शब्दांमध्ये उत्तर दिले. महाराष्ट्रातील कोणत्याही समाजाला असुरक्षित वाटावे, अशी सरकारची भूमिका मुळीच नाही. राज्यात कायद्याचे राज्य आहे. प्रत्येक समाजाच्या स्वातंत्र्याचा विचार केला जात आहे. पण, राजकीय हेतुने काही नॅरेटिव्ह सेट केला जात असेल, तर त्याकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. गुन्ह्याकडे गुन्हा म्हणूनच पाहिले जाईल. कोणत्याही समाजाला घाबरण्याचे कारण नाही.
******

प्रतिक्रिया :
हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना घडत असताना, केवळ राजकीय हेतुने ‘व्होट बँक’ सांभाळण्यासाठी सभागृहात आणि सभागृहाबाहेरही काही नेते चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न करतात. हिंदूंवरील अत्याचाराच्या घटनांवर तुम्ही काहीच बोलणार नाही आणि अल्पसंख्याक समाज असुरक्षित झाला म्हणून गळा काढणार हे कसे चालेल? हिंदूत्व आणि धर्म कार्यात कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही. धर्मकार्य अविरत सुरू राहील.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00